कोल्हापूरमध्ये शासकीय नोकरी पाहीजे; येथे करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 September 2020
  • पदाचे नाव आणि तपशील :

कोल्हापूर : कोरोना विषाणूने राज्यात धुमाकूळ घातला, दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभाग अहोरात्र प्रयत्न करत आहे मात्र, त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे कमी असल्यामुले वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण येतो, हा ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकने आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्वावर पदे भरण्याचा निर्णय घेतला. ही पदे केवळ तीन महिन्यासाठी भरण्यात येणार आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन पदाचा कालावधी वाढवण्यात येईल. 

पदाचे नाव आणि तपशील :

अनु. क्र     पदांचे नाव         पदे

१.     वैद्यकीय अधिकारी    १६
२.     स्टाफ नर्स        २०
३.     प्रसिद्धी समन्वयक    ०१

 

शैक्षणिक पात्रता व वेतन

१. 
एमबीबीएस/ एम. डी आयुर्वेद ५० हजार वेतन
एमबीबीएस/ बीएएमएस ३० हजार वेतन

२. 
जी. एन. एम २० हजार
ए. एन. एन  १७ हजार

३. 
जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन
५ वर्षे कामाचा अनुभव

मुलाखतीचे ठिकाण : 

कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे ग्राउंड समोर कोल्हापूर 

मुलाखतीची तारीख व वेळ: 

उद्या मंळवारी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत उमेदवारांना सर्व कागदपत्रासह उपस्थित राहावे

अर्ज कसा करावा:

कोल्हापूर महानगरपालिकेने जाहीरातीसोबत एक अर्जाचा नमुना दिला आहे. त्या नमुन्या हस्तलिखीत किंवा टंकलिखीत अर्ज भरावा. त्यासोबत लागणाऱ्या प्रमाणपत्रावर स्व हस्ताक्षर करुन नियोजित वेळेत उपस्थित रहावे.

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://drive.google.com/file/d/1CgF14KpzVC1JFt4b96FAV70ivqAV1nSr/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News