अहमदनगरमध्ये सरकारी नोकरी पाहिजेत? येथे करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयात विविध पदे भरण्यात येणार आहेत.

अहमदनगर : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयात विविध पदे भरण्यात येणार आहेत. या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुप आहेत. कौशल्य आणि गुणवत्तेच्या आधारे या जाग भरण्यात येणार आहेत. केवळ ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. 

पदाचे नाव आणि तपशील :  

अनु. क्र    पदांचे नाव               पदे
१.         फिजिशियन                ०३                     
२.         वैद्यकीय अधिकारी      १९
३.  आयुष वैद्यकीय अधिकारी    ०९
४.         स्टफ नर्स                  ४३
५.       एक्स- रे टेक्निशियन      ०१
६.     ईसीजी  टेक्निशियन        ०७      
७.     लॉब  टेक्निशियन           १३
८.     फार्मासिस्ट                   ०६
९.  डाटा ऑपरेटर                  ०६

शैक्षणिक पात्रता :

अनु. क्र.१ :  
एम. डी. मेडीसीन 
वय- ६० पेक्षा अधिक नसावे
वेतन- ७५ हजार

अनु. क्र.२ :  
एमबीबीएस
वेतन- ७५ हजार

अनु. क्र.३ :  
बीएएमएस, बीयुएमएस
वेतन- ६० हजार

अनु. क्र. ४ :  
बी. एस्सी. नर्सिग
वेतन- २० हजार

अनु. क्र. ५ :  
निवृत्त एक्स- रे टेक्निशियन
वेतन- १७ हजार

अनु. क्र. ६ :  
बी. एस्सी फिजिक्स, केमिस्टी, बॉयलोजी
ईसीजी हाताळणीचा एक वर्ष अनुभव
वेतन- १७ हजार 

अनु. क्र. ७ :  
बी. एस्सी डीएमएलटी 
वेतन- १७ हजार 

अनु. क्र. ८ :  
कोणताही पदवीधर
इंग्रजी ४० आणि मराठी ३० टायपींग
एमएस- सीआयटी 
वेतन- १७ हजार 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 

२० जुलै २०२०
रात्री १२ पर्यंत

अर्ज कसा करावा :

www.nhmahmednagar.com या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्जात नाव, पत्ता, वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव भरावा लागणार आहे. त्यासोबत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागणार आहे. संपुर्ण निवड प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत ईमेल आयडीत बदल करु नये. ऑनलाईन व्यतिरिक्त पोस्ट, इ- मेल, कुरियर किंवा वैयक्तिक भरलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. 

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://drive.google.com/file/d/1bw1HFyhLdXNSBmiV_-4LX7zPvKy1Uy6F/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News