दीर्घायुषी व्हायचंय? तर करा हे उपाय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

वाढत्या वयानुसार शरीरामध्ये अनेक बदल दिसून येतात. मग त्यामध्ये वाढतं वजन, चेहरा निस्तेज होणं, चेहऱ्यावरील सुरकुत्या इ. गोष्टींमुळे बहुतेकांमध्ये आत्मविश्वासाची कमी निर्माण होते. प्रत्येकाला आपण तरुण दिसावे असेच वाटत असते.परंतु वाढणाऱ्या वयामुळे ते शक्य होत नाही.त्यामुळेच आता वाढत वय लपविण्यासाठी आणि नेहमी तरुण दिसण्यासाठी काही उपाय आम्ही सांगणार आहोत. 

नुकत्याच केलेल्या संशोधनातून असे समोर आले की, तुमच्या दैनंदिन आहारात कॅलरीजचे प्रमाण जर जास्त असेल तर त्यामुळे तुमचं वय अधिक दिसू शकतं. आणि जर तुम्हाला तुमचं वय लपवायचं असेल, तर त्यासाठी तुमच्या आहारामध्ये कमीत कमी कॅलरीज असणे आवश्यक आहे.  त्याचप्रमाणे शरीरात वाढलेल्या कॅलरीजमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये कॅन्सर, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचा समावेश होतो.आणि यासाठी शरीरामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असणं गरजेचे आहे.  यासाठी संशोधनात एका उंदरावर कॅलरीजच्या कमी वापराचा प्रयोग करून पहिला तर त्यामध्ये असे सिद्ध झाले की, कमी कॅलरीजमुळे अनेक आजारांवर प्रतिबंध करता येऊ शकतो. 

या संशोधनात ५६ उंदरांवर ४० वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये  आहारामध्ये ३० टक्के कमी कॅलरीज खाणाऱ्या उंदरांची तुलना जास्त कॅलरीज खाणाऱ्या उंदरांशी करण्यात आली. आणि या प्रयोगातून ही माहिती समोर आली की, निरोगी आणि सदृढ शरीरासाठी शरीरामधील कॅलरीजचे प्रमाण हे कमी असायला पाहिजे. तसेच कमी कॅलरीजमुळे तुमच्या चेहरा अधिक तेजस्वी दिसून तुम्ही तरुण दिसू लागता. त्यासाठीच योग्य वेळी औषधांचा वापर करून कॅलरीज नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News