राष्ट्रीय शिबिरातून वॉकर मनीषची एक्झिट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

चार वर्षांपूर्वीच्या रिओ ऑलिंपिकला पात्र ठरलेला रेस वॉकर मनीष रावंत राष्ट्रीय शिबिरातून निघून आला.

नवी दिल्ली: चार वर्षांपूर्वीच्या रिओ ऑलिंपिकला पात्र ठरलेला रेस वॉकर मनीष रावंत राष्ट्रीय शिबिरातून निघून आला. भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने शिबिर सोडण्याची परवानगी नाकारल्यावरही तो डेहराडूनला आला आहे.

बंगळूरमध्ये कोरोनाची साथ असली, तरी क्रीडा प्राधिकरणात असलेल्या खेळाडूंचा सराव सुरू असल्याचे सांगितले जात होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी राष्ट्रीय शिबिर योग्य जागा असल्याचे महासंघांचे मत होते. याच शिबिरात असलेल्या मनीषला घरी जाण्याची परवानगी नाकारली; पण त्याला शिबिरातच राहण्यास सांगण्यात आले. अखेर त्याने शिबिर सोडून आपल्या गावी म्हणजे डेहराडूनला परतण्याचे ठरवले.

उत्तराखंड पोलिसात नोकरीस असलेल्या मनीषने आपण सध्या डेहराडूनला विलगीकरण केंद्रात आलो असल्याचे सांगितले. बंगळूरला फारसा सराव होत नव्हता. तिथे कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्यामुळे मी उत्तराखंडला परतलो, असे त्याने सांगितले. शिबिर सोडण्याची परवानगी मागितल्यावर, तुला येथे सुरक्षित वाटत नसल्यास तू जाऊ शकतोस, असे ऍथलेटिक्‍स महासंघाने आपणास सांगितले, असा दावा मनीषने केला. मात्र मात्र कोणालाही कसलीही कल्पना न देता मनीष शिबिरातून बाहेर पडल्याचा दावा बंगळूर येथील क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News