प्रीमियर लीग कोरोनाच्या विळख्यात; 12 जन कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 29 May 2020

"सोमवार 25 मे आणि मंगळवार 26 मे रोजी घेतलेल्या 1008 खेळाडू आणि क्‍लब कर्मचाऱ्यांची कोविड- 19 साठी चाचणी घेण्यात आली होती, त्यात तीन क्‍लबचे चौघे बाधित आढळले आहेत, असे लीगने बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

लंडन : इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर, आणखी चार कोविड- 19 संक्रमित मिळाल्याचे प्रीमियर लीगने जाहीर केले असून संपूर्ण लीगमधील एकूण पोझिटिव्ह संख्या 12 झाली आहे. नव्या चार बाधितांची प्रकरणे तीन क्‍लबमधून आली आहेत; पण लीगने कोविड- 19 चाचणीत बाधित ठरलेल्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.

"सोमवार 25 मे आणि मंगळवार 26 मे रोजी घेतलेल्या 1008 खेळाडू आणि क्‍लब कर्मचाऱ्यांची कोविड- 19 साठी चाचणी घेण्यात आली होती, त्यात तीन क्‍लबचे चौघे बाधित आढळले आहेत, असे लीगने बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ""खेळाडू किंवा क्‍लब कर्मचारी, जे चाचणीत बाधित आढळले आहेत, त्यांना आता सात दिवसांच्या कालावधीसाठी स्वयं-विलगीकरणात जावे लागेल,"" असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी 19 ते 22 मे या कालावधीत 996 खेळाडू व क्‍लब कर्मचाऱ्यांची कोविड- 19 साठी चाचणी घेण्यात आली होती, त्यापैकी दोन क्‍लबचे दोघे जण बाधित आढळले होते. 15 ते 18 मे या कालावधीत 748 खेळाडू व क्‍लब कर्मचाऱ्यांची चाचणी झाली होती, त्यात तीन क्‍लबचे सहा जण बाधित ठरले होते, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील चाचणीत प्रत्येक क्‍लबसाठी उपलब्ध असलेली चाचणी 50 वरून 60 पर्यंत वाढविण्यात येईल, असे प्रीमियर लीगने स्पष्ट केले आहे.

20 क्‍लब एकत्रित सरावास तयार

प्रीमियर लीगमधील 20 क्‍लबनी बुधवारी एकमताने एकत्रित सराव सुरू करण्यास सहमती दर्शवली. संघ आता अनावश्‍यक जवळचा संपर्क टाळत गटाने आणि टॅकलिंगमध्ये व्यस्त राहत सराव करू शकतात, असा याचा अर्थ होत आहे. कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर 13 मार्च रोजी इंग्लंडमधील अव्वल श्रेणी फुटबॉल सामने निलंबित करण्यात आल्यानंतर मागील मंगळवारपासून प्रीमियर लीग क्‍लबना लहान गटात, संपर्काविना सराव करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News