तुझ्या येण्याची प्रतिक्षा

अमरादीप शेंडे, यवतमाळ
Saturday, 22 June 2019

देव नाही माहीत मले, 
तुच आमचा देव,
एकदाच आता 
तुझ पाऊल जमिनीवर ठेव...

पावसा पावसा सांग, 
कधी तू बरसशील, 
शेतकऱ्यांचं रान माझ्या, 
 कधी रे फुलवशील, चातकासारखी वाट तुझी, 

बघतो रे शेतकरी,
 बरसू दे आता, 
सरी वरती सरी 
तुझी वाट सगळे, 

आतुरतेने बघतात,
 तू बरसला कि, 
 सारे आनंदात दिसतात 
तुझ्याच भरवश्यावर, 

जगतो रे शेतकरी,
 तूच नाही पडला तर
भीक मांगल दारो-दारी 
तुला आम्ही सर्व,

जिवन आमचे मानतो,
 तू नवीन- नवरी सारखा, 
 राग धरून बसतो 
घोटभर पाण्यासाठी, 

जिव्हाची होते  लाही, 
तुला त्याबद्दल,
 काहीच वाटत नाही
 आमच्याकडं ये तू

 तुला कहाणी आमची सांगतो, तुझ्यासाठी आम्ही
 नदी-नाले हिंडतो
नदी-नाले, धरण, विहरी 
सुख्या पडल्या गावच्या, आभाळाकडे सारख्या, 

नजरा वळल्या आमच्या 
तुझ्याशिवाय शेतकऱ्याचा
कुणी नाही सखा, 
सरकरसारखा ह्या तु

देऊ नको धोका
झाडे लावा झाडे जगवा
संदेश जागो-जागी दिसतो,
 तरी आम्ही झाडाची 
कत्तलच करतो

आता आम्ही सर्व 
प्रतिज्ञा अशी करतो,
दरवर्षी निदान
एक झाड घरी लावतो

देव नाही माहीत मले, 
तुच आमचा देव,
एकदाच आता 
तुझ पाऊल जमिनीवर ठेव

तुझ्या येण्याचं स्वागत 
मी अस काही करीन, 
गावभर सर्वांना 
जेवण मी देईन

सोड तो राग आता
तुझ दर्शन आम्हा दे, 
नदी-नाले, धरण,
विहिरी भरून जाऊ दे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News