वाट पाहणारे मन

सुशील सारोळकर
Monday, 13 May 2019

ठाव आहे मज पोलाद स्वर्ण बने परीसाने जरी...
जैसेची माझ्या अंतःकरणाची अग्नी तुझ्या प्रितीने होईल का बरी?

कळे ना तयासी माझं माझिया गुंतले...
जैसे माळेमध्ये माणिक मोती गुंफले!

कळत ना कळे तुझं माझिया मनाचा भाव...
जैसे दुष्काळात अस्थाव्यस्थ झालेले गाव!

ठाव आहे मज पोलाद स्वर्ण बने परीसाने जरी...
जैसेची माझ्या अंतःकरणाची अग्नी तुझ्या प्रितीने होईल का बरी?

बघून आहे वाट धरशील का माझा हात...
अंधःकाराच्या दिव्यात तेवत ठेवशील का वात!

सांगणे मज आता तुजला एकच आहे...
जीव गेला सोडून तरी मन तुझीच वाट पाहे!
तुझीच वाट पाहे!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News