‘ईव्हीएम’ वर मतदान हे लोकशाहीला कलंक ; ममता बॅनर्जी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • ममता बॅनर्जी ; विरोधकांना पुन्हा आवाहन

  • आम्हाला मतदान यंत्रे नकोत, पुन्हा एकदा बॅलेट पेपर हवेत​

कोलकता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘ईव्हीएम’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. ‘ईव्हीएम’ऐवजी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा बॅलेट पेपरचा वापर केला जावा, यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतक्‍या जागा तृणमूल काँग्रेसला मिळाल्या नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रमुख असलेल्या ममता यांनी आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या,‘‘ आपल्याला लोकशाही वाचविली पाहिजे.

आम्हाला मतदान यंत्रे नकोत, पुन्हा एकदा बॅलेट पेपर हवेत. यासाठी विरोधकांनी चळवळ उभारायला हवी, त्याची सुरवात पश्‍चिम बंगालमधून करता येईल. अमेरिकेनेसुद्धा ईव्हीएमवर बंदी घातली आहे.’’ ‘ईव्हीएमच्या सविस्तर माहितीसाठी शोधसमितीची स्थापना करणे आवश्‍यक असल्याचे मतही ममता यांनी व्यक्त केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News