लोणावळ्यात उभारतय ग्रामीण तरुणांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण केंद्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

दरवर्षी १४०० विद्यार्थ्यांना माफक दरात व्यवसायाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लोणावळा :  ग्रामीण भागातील तरुणांना व महिलांना कौशल्य प्रदान करून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा व ते स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहावेत, यासाठी मुंबईतील यंग मेन्स ख्रिश्‍चन असोसिएशनतर्फे (वाय. एम. सी. ए) संस्थेतर्फे २९ फेब्रुवारी रोजी लोणावळा येथील कान्हेळेजवळ व्यवसायाभिमुख प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

वायएमसीएच्या आशिया व पॅसिफिक अलायन्सचे अध्यक्ष चिन सेंग चिन आणि तळेगावचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. याप्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण, इलेक्‍ट्रिकल, नर्सिंग, पॅरामेडिकल, ब्युटी थेरपी, शिवणकाम, नैसर्गिक शेती या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रामध्ये दरवर्षी १४०० विद्यार्थ्यांना माफक दरात व्यवसायाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर रोजगार मिळावा म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुप, ब्ल्यू  क्रॉस लॅबोरेटरीज या कंपन्यांशी सामंजस्य करार केला असल्याचे वायएमसीएचे महासचिव पोल जॉर्ज यांनी सांगितले. अशा व्यवसायभिमुख केंद्रामुळे तरूणांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळून रोजगार प्राप्त होईल, असे जॉर्ज यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News