VIVO ची आयपीएलमधील स्पॉन्सरशीप रद्द 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 August 2020
  • मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन राष्ट्रांमध्ये तणावपूर्ण संबध निर्माण झाले आहे.
  • भारताने ५९ चिनी अँपवरती बंदी आणून चीनला मोठा दणका दिला होता.
  • कोरोना विषाणूच्या प्राधुरभावामुळे  यंदा मार्च महिन्यात सुरु होणारी आयपीएल ची स्पर्धा १९ सप्टेंबर पासून दुबईत खेळवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई :- मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन राष्ट्रांमध्ये तणावपूर्ण संबध निर्माण झाले आहे. भारताने ५९ चिनी अँपवरती बंदी आणून चीनला मोठा दणका दिला होता. कोरोना विषाणूच्या प्राधुरभावामुळे  यंदा मार्च महिन्यात सुरु होणारी आयपीएल ची स्पर्धा १९ सप्टेंबर पासून दुबईत खेळवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  रविवारी पारपडलेल्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या मीटिंग नंतर आयपीएलचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. परंतु भारताने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचल्यानंतर आता आयपीएलचे प्रमुख स्पॉन्सर असणाऱ्या VIVO बद्दल आयपीएल संचालक समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. 

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिल समितीने प्रमुख स्पॉन्सर म्हणून VIVO या चिनी कंपनी सोबत राहण्याचाच निर्णय घेतला होता. परंतु सध्या भारत चीन संबंध बिघडल्यामुळे चिनी कंपन्यांना होणार विरोध आणि चिनी स्पॉन्सर ठेवल्यामुळे होणारी टीका लक्षात घेऊन २०२० मध्ये होणाऱ्या आयपीएल या स्पर्धेसाठी VIVO स्पॉन्सर असणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या प्रमुख स्पॉन्सर च्या यादीतून VIVO ची हकालपट्टी केल्यानंतर सूत्रांच्या माहितीनुसार एका भारतीय कंपनीसोबत स्पॉन्सरशिप संदर्भातील बातचीत सुरु आहे. २०२० आयपीएलच्या स्पॉन्सरशीप रेस मध्ये एका अमेरिकन कंपनीचा समावेश असल्याचे ही कळते. आयपीएलचा १३वा सीझन हा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान रंगणार असून ही स्पर्धा एकूण ५३ दिवस चालणार आहे. यास्पर्धेत ६० क्रिकेट सामने होणार असून यंदा पहिल्यांदाच फायनल मॅच ही वीकडेला होणार आहे. ह्या स्पर्धेत एकूण १० डबल हॅडर सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल २०२० मध्ये सामन्यांची सुरुवात ही भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३०ला होणार असून डबल हॅडर सामने हे दुपारी ३:३० वाजता सुरु होणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News