विवेक नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत? 

यिनबझ टीम
Thursday, 24 January 2019

 यिनबझ टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार असल्याचं बोललं जात आहे आणि अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा आहे. या बायोपिकमध्ये विवेक मोदी यांच्या तरुणपणीची भूमिका साकारणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवेकने या चित्रपटासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. या वर्षी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सध्या तरी या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे.  उमंग कुमार या बायोपिक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणादेखील करण्यात येईल. एकूणच काय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचादेखील बायोपिक येणार म्हणजे पुढील वर्ष राजकीय नेत्यांच्या बायोपिकचं असणार हे निश्‍चित. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News