विठ्ठल आहे तुझ्यात रे ! 

शुभम शंकर पेडामकर
Wednesday, 1 July 2020

बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!!!

बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!!!

ह्या दोन ओळी जरी आपण शांत चित्त ठेऊन म्हंटल्या तरी एकाचवेळी सकारात्मक ऊर्जा,  नवा जोश व जे काही तुम्हांला करायचं आहे त्याचा मार्ग गवसतो. 

संतांची शिकवण आपण आजतागायत ऐकत आलो आहोत आणि त्या शिकवणी अंमलात आणण्याचा जो-तो त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. नाही निर्मळ जीवन काय करील साबण रे तिथून ते अगदी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी इथवर जरी विचार केला तरी प्रत्येक अभंगात बोध हा असतो. तो बोध लक्षात घेऊन आपण आपल्या जीवनाचा खडतर मार्ग चालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या मार्गावर येणाऱ्या संकटांना आपण सामोरे जावू शकतो इतकी ताकद ह्या संतांच्या शिकवणी मध्ये आहे. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले सुद्धा वाईट होत नाही, प्रामाणिकपणा अंगी ठेऊन संयमाची जोड ठेवली तर आपल्या आयुष्यात जे काही करायचे ते नक्कीच होते.  देवाचे नामस्मरण करत राहायचे, देव कुठल्याही वाटेने येऊन तुमची खाली झोळी भरून जातो असे अनेक दाखले आपण वाचले आहेत किंवा पाहिले आहेत अथवा ऐकले आहेत.

आजूबाजूला नकारात्मकतेचा सूर येत आहे अश्या वेळी काय करावे ?  हा प्रश्न सगळ्यांना पडतो तेव्हा हे विठ्ठला, पांडुरंगा धाव घे असं मनापासून आपण म्हंटलं तर कोणत्या ना कोणत्या रुपात तो येतो पण त्यावेळी वेळीच तो "विठ्ठल" आहे हे लक्षात आलं पाहिजे.

शेवटाला एवढंच म्हणेल की, आत्मचिंतन, भक्ती, प्रामाणिकपणा आणि संयम ह्या चार गोष्टी आयुष्य जगत असताना उचित ठिकाणी आपण वापरल्या तर आपलं कल्याण होणार हे नक्की. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News