नात्यांची गरिबी सांगणारा 'द रायकर केस' वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला 

संतोष भिंगार्डे
Thursday, 16 April 2020

 "वुट'वर आलेली "द रायकर केस' ही वेबसीरिज काहीशी वेगळी आहे. ती गोव्यामधील नामवंत उद्योगपती यशवंत नाईक रायकर यांच्या कुटुंबावर आधारित आहे.

कुटुंब, खून, क्राईम, थ्रिलर या विषयांवर आधारित आजवर अनेक चित्रपट आलेले आहेत आणि मालिकासुद्धा लोकप्रिय आहेत. आता मात्र "वुट'वर आलेली "द रायकर केस' ही वेबसीरिज काहीशी वेगळी आहे. ती गोव्यामधील नामवंत उद्योगपती यशवंत नाईक रायकर यांच्या कुटुंबावर आधारित आहे.

या वेबसिरीजमध्ये यशवंत नाईक रायकर यांची भूमिका अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी साकारली आहे. रायकर कुटुंबातील एक व्यक्ती मृत्युमुखी पडते. त्या व्यक्तीचा खून झाला की त्याने आत्महत्या केली याचा शोध सुरू होतो. यातच या कुटुंबाचे एक-एक पैलू समोर येऊ लागतात. त्यानंतर या समृद्ध कुटुंबात असलेली नात्यांची गरिबी समोर येऊ लागते. ही एक थ्रिलर वेबसीरिज आहे. आत्महत्या की खून याचा शोध घेताना ही वेबसीरिज प्रेक्षकांना गुंतवून ठेवते.

सर्व कलाकारांचा अभिनय या वेबसिरीजची जमेची बाजू आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेत्री अश्विनी भावे, अभिनेता ललित प्रभाकर, अजय पुरकर, अभिनेत्री मनवा नाईक हे मराठमोळे कलाकार लक्ष वेधून घेतात. याशिवाय इतर कलाकारांचा अभिनयदेखील उत्तम आहे. अश्विनी भावे या वेबसीरिजमधून वेबविश्वात पदार्पण करत असून बरेच वर्षांनी त्यांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे. अर्थातच अश्विनी वेबप्लॅटफॉर्मवर पाहणं सुखद आहे. साक्षी नाईक रायकर त्यांनी उत्तम साकारली आहे. ही वेबसीरिज आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. कुटुंबातील सदस्यांचा स्वार्थी स्वभाव कसा बाहेर येतो, हे कॅमेरामध्ये आदित्यने उत्तमरित्या उतरवले आहे.

महाराष्ट्र

maharashtra

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News