ऑनलाइन क्लास सुरु झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

ज्या विद्यार्थ्यांच ऑनलाईन शिक्षण सुरू झालं आहे. अशा विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहण्याचं कोणतचं कारण नसावं असं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिका प्रशासनाने सर्व क्लासेस आणि कॉलेज लवकर ऑनलाईन सुरू करावेत असे आदेश दिले आहेत.

अमेरिकेत शिक्षण व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं, पण स्वप्त आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पुर्ण करावं लागणार असं दिसतंय. कारण कोरोना महामारीचा अमेरिकेला प्रचंड मोठा धक्क बसला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळतंय अशा विद्यार्थ्यांचा रद्द करण्याची परवानचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. इमिग्रेशन आणि सीमा शुल्क विभागाकडून हा निर्णय घेतल्याचं सीएनएनने वृत्त दिलं आहे. 

ज्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला आहे, अशा विद्यार्थ्यांना लवकरचं अमेरिका सोडावी लागणार आहे. कारण अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळत आहे अशा विद्यार्थ्यांना देश सोडावा लागणार अन्यथा हद्दपार केलं जाईल असं इमिग्रेशन आणि सीमा शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

ज्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. सध्या अमेरिकेत ११ लाखाहून अधिक विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी आहेत. सर्वात अधिक विद्यार्थी हे चीन देशातील आहेत, त्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, आणि कॅनडा या देशांतील अधिक विद्यार्थी सध्या अमेरिकेत शिक्षणासाठी आहेत. 

ज्या विद्यार्थ्यांच ऑनलाईन शिक्षण सुरू झालं आहे. अशा विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहण्याचं कोणतचं कारण नसावं असं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिका प्रशासनाने सर्व क्लासेस आणि कॉलेज लवकर ऑनलाईन सुरू करावेत असे आदेश दिले आहेत. परदेशी विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवण्यासाठी प्रशासनाने एक योजना तयार केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News