वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली तरुणींची वर्जिनिटी टेस्ट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

महानगरलिका रुग्णालयामध्ये 100 तरुणींना निर्वस्त्र करुन वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली वर्जिनिटी टेस्ट केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली.

सुरत: महानगरलिका रुग्णालयामध्ये 100 तरुणींना निर्वस्त्र करुन वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली वर्जिनिटी टेस्ट केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. फक्त निर्वस्त्र करुन तपासणीचं केली नाही तर त्यांना अश्लील प्रश्न विचारुन मानसिक त्रास दिल्याचा खळबळ जनक दावा पिडीत तरुणींनी केला आहे. या संपुर्ण प्रकरणाची तक्रार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तरुणींने केली मात्र, महानगरपालिकेने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही अशी माहिती एका वृतसंस्थेने दिली आहे.

काही दिवसापुर्वी सुरत महानगरपालिका रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यांना काही दिवसाचे प्रशिक्षण देऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय तपासणी वेळी डॉक्टरांनी 100 प्रशिक्षणार्थी तरुणींना अंतरवस्त्र काढण्यासाठी सांगितले होतो. त्यानंतर तरुणींची कसून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुप्तागांणा हात लावून वर्जिनिटी टेस्ट करण्यात आली. कधी गर्भधावती झाली होतीस का? असे मानसीक त्रासदायक प्रश्न विचारल्याची माहिती तरुणींनी दिली आहे.

यासंपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी पिडीत तरुणींनी केली आहे.  स्त्री आरोग्य विभागाचे प्रमुख अश्विन वछानी म्हणाले की, नियमानुसारचं आम्ही तरुणींची शारीरिक तपासणी केली आहे. अशा प्रकारची शारीरिक वैद्यकीय तपासणी पुरुषांची होते की नाही हे माहिती नाही' असे म्हणाले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News