अनुष्काच्या या फोटोशूटवर विराटची प्रतिक्रिया; म्हणाला…

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020

अनुष्काच्या या फोटोशूटवर विराटची प्रतिक्रिया; म्हणाला…

अनुष्काच्या या फोटोशूटवर विराटची प्रतिक्रिया; म्हणाला…

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली हे कपल काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहे. कारण विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. तेव्हापासून चाहत्यांनी अनेकदा दोघांना गुड न्यूजबाबत डिवचलं होतं. परंतु आता त्याच्या आयुष्यात आता खरंच बदल झाला असून लवकरचं त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. पण नुकतेच अनुष्काने आता एक फोटो शेअर केला त्यावर विराट कोहलीने प्रतिक्रिया देवून सर्वाचे लक्ष वेधले आहे.

“जीवन निर्माण करण्याच्या अनुभवापेक्षा वास्तविक आणि नम्र काहीही नाही.” अशा पध्दतीचं  कॅप्शन लिहून अनुष्काने आपला फोटो शेअर केला होता. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे. काही तासांत शेकडो चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच “माझं संपूर्ण जग मला एकाच फ्रेममध्ये दिसतंय.” ही प्रतिक्रिया विराटने दिली आहे.

२०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानं अनुष्काला अनेकांनी तिच्या ‘गुड न्यूज’बाबात प्रश्न विचारलं होतं. पण त्यावेळी अनुष्काने हे सगळं फेटाळून लावलं होतं. सध्या होत असलेल्या चर्चा म्हणजे अफवा असंही ती म्हणाली होती. सध्या मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलं असून इतर गोष्टींसाठी माझ्याकडे वळ नसल्याचे सांगितले होते.  विराट-अनुष्काने आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News