विराट- रोहित क्रिकेटविश्वात सर्वोत्तम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 June 2020
  • विराट आणि रोहित यांना बाद करण्याचा प्रश्न विचारणाऱ्या फिन्चला, तूच यातून मार्ग काढ, असा सल्ला मी त्याला दिल्याचे पंच गॉफ यांनी सांगितले.

लंडन : संताजी- धनाची यांची पाण्यातही दिसणारी छबी मोघलाना दहशत बसवणारी होती. आत्ताच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार ऍरॉन फिन्चसाठी विराट-रोहित हे जणू काही संताजी- धनाजीसारखेच आहेत. त्यांना कसे बाद करायचे, यासाठी त्याने आपल्याकडे विचारणा केली होती, अशी माहिती त्या वेळी मैदानावर असलेले पंच मायकेल गॉफ यांनीच उघड केली.

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटविश्वात सर्वोत्तमच आहे. या प्रकारचे विक्रम एक तर विराट किंवा रोहितच्या नावावर आहे. हे दोघेही मैदानावर असतात, तेव्हा फिन्चच काय प्रतिस्पर्धी संघांच्या मनात धडकी भरलेली असते. विराट आणि रोहित यांना बाद करण्याचा प्रश्न विचारणाऱ्या फिन्चला, तूच यातून मार्ग काढ, असा सल्ला मी त्याला दिल्याचे पंच गॉफ यांनी सांगितले.

मला तो सामना चांगला आठवतोय, जानेवारीत बंगळुर येथे भारत-ऑस्ट्रेलियातील लढत होती. 286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली (89) आणि रोहित शर्मा (119) यांनी तुफानी टोलेबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची निर्णायक भागीदारी केली होती.

गॉफ म्हणतात, मी स्क्वेअर लेगला होतो, फिन्च माझ्या बाजूलाच उभा होता, या दोघांचा खेळ पाहणे अविस्मरणीय असते... एवढे बोलून झाल्यावर या दोघांना बाद कसे करायचे, असा प्रश्न फिन्चने मला केला... मी तिरकस नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले... माझ्याकडे माझे भरपूर काम आहे, त्यांना कसे बाद करायचे हे तुलाच ठरवायचे आहे... असे आपण फिन्चला सांगितले. गॉफ हे अनुभवी पंच आहेत. डरहॅम क्‍लबकडून ते 67 प्रथम श्रेणी सामने खेळलेले आहेत. ते ऑफस्पिनर गोलंदाज होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News