अनुष्कासाठी विराट डब्बू रत्नानीच्या भूमिकेत ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020
  • नुकतेच विराट कोहलीने आपल्या पत्नीसाठी खास आलिशान असा फ्लॅट घेतला आहे. हा फ्लॅट वरळी सी फेस ला लागून असलेल्या इमारतीमध्ये असून या घराची किंमत तब्बल ३५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जातेय.
  • याच घरात सध्या विराट कोहली आपल्या पत्नीसाठी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसतोय.

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचं एक वेगळाच नातं आहे. दोन्ही क्षेत्र हि भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय.बॉलिवूड आणि क्रिकेटजगतामध्ये असलेल्या काहींच्या मनात तर हळुवार कोपरा  देखील आहे. असच उदाहरण म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचं.

भारतीय क्रिकेटचा विक्रमादित्य म्हून ओळखला जाणारा विराट कोहली आणि त्याची पत्नी हे दोघेही सध्या एकमेकांसोबत निवांत क्षण घालवताना दिसतायत. एकमेकांच्या व्यस्त कार्यक्रमातून वीरूष्का हे दोघेही वरळी से फेस च्या जवळ असलेल्या निवासस्थानी चांगलीच मौज मजा करताना दिसतायत.

नुकतेच विराट कोहलीने आपल्या पत्नीसाठी खास आलिशान असा फ्लॅट घेतला आहे. हा फ्लॅट वरळी सी फेस ला लागून असलेल्या इमारतीमध्ये असून या घराची किंमत तब्बल ३५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जातेय.याच घरात सध्या विराट कोहली आपल्या पत्नीसाठी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसतोय.

विराट कोहलीने नुकतेच  अनुष्का शर्माची   काही क्षणचित्रे टिपली. याबाबतची माहिती अनुष्का शर्मानी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली आहे.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News