विकेटकिपिंगमध्ये पंत आणि KL राहुल यांच्यात 'हा' आहे फरक, कोहली सांगतो

यिनबझ टीम
Tuesday, 21 January 2020

यावेळी विराटने पंत आणि केएल राहूलचती तुलना विश्वचषक 2003 मध्ये राहुल द्रविडने भारताकडून केलेल्या विकेटकीपिंगसोबत केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका २-१ ने जिंकल्यानंतर ऋषभ पंतच्या भविष्यावर कर्णधार विराट कोहलीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कोहली म्हणाला की आपण केएल राहुलबरोबर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पुढे जाऊ शकतो. राहुल संघाला योग्य बॅलेंस ठेवतो. यावेळी विराटने पंत आणि केएल राहूलचती तुलना विश्वचषक 2003 मध्ये राहुल द्रविडने भारताकडून केलेल्या विकेटकीपिंगसोबत केली.

ऋषभ पंत फिट असूनदेखील तीसऱ्या वनडेमध्ये K L राहुलने विकेटकीपिंग केली होती. त्याचबरोबर दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पंतला दुखापत झाल्यावर राहूलने डाव सांभाळला होता. त्या सामन्यात सामनावीर म्हणूनही राहूलला निवडण्यात आले होते.

कोहली म्हणतो...
राहुलच्या किपिंगकडे जर आपण पाहिलं तर आम्हाला अजून एक फलंदाज त्याच्या रूपात मिळू शकतो, काहीदा त्याच्यामुळे आमची फलंदाजी खूप मजबूत होते. टीम बॅलेन्सच्या बाबतीत राहूलकडे आम्ही महत्त्वाचा घटक म्हणून पाहातो. 2003 विश्वकरंडक पाहिल्यास, राहुल द्रविडने तिथे किपिंग केली होती, त्यामुळे तिथला बॅलेंस काही वेगळाच झाला होता.

पत्रकारांशी बोलताना कोहलीने अजून एका गोष्टीचा सारांश दिला की कदाचित राहूलमुळे पंतला मोठी विश्रांती मिळू शकते. विराट कोहली म्हणतो की सध्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया सोबतच्या वनडे सामन्यांमध्ये फलंदाजीला घेऊन आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला म्हणून आम्ही शेवटच्या सामन्यामध्ये काही बदल केले आहेत, त्या बदलांप्रमाणे आम्ही पुढे जात राहू, असेही कोहली म्हणाला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News