विराट कोहली आणि रोहित शर्माचं आयसीसीच्या वन डे क्रमवारीतील अव्वल स्थान कायम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020
  • आयसीसीच्या वन डे क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांनी आपलं अव्वल स्थान कायम ठेवल आहे.
  • आयसीसीच्या वनडे रँकिंग मध्ये विराट कोहली हा प्रथम स्थानावर असून रोहित शर्माने क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.

दुबई :-  आयसीसीच्या वन डे क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांनी आपलं अव्वल स्थान कायम ठेवल आहे. आयसीसीच्या वनडे रँकिंग मध्ये विराट कोहली हा प्रथम स्थानावर असून रोहित शर्माने क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. काल मंगळवारी आयसीसीकडून जारी केलेल्या वनडे रँकिंग मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट हा ८७१ गुणांसह प्रथम स्थानावर असून भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा ८५५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराट आणि रोहित नंतर आयसीसीच्या क्रमवारीत ८२९ गुणांसह  तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम हा आहे.

फलंदाजांनंतर आयसीसीच्या उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत भारताचा गोलंदाज बुमराह हा दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंड बोल्ट हा ७२२ गुण  मिळवून आयसीसी वनडे च्या उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय गोलंदाज बुमराह ७१९ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. अफगाणिस्थानचा मुजीब उर रहमान ह्याने ७०१ गुण मिळवून गोलंदाजांच्या यादीत तिसर स्थान पटकावलं आहे.   

टॉप १० ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजा हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजा हा आठव्या स्थानावर असून अफगाणिस्थानचा खेळाडू मोहम्मद नबीने यात प्रथम स्थान पटकावले आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स हा ऑलराउंडर च्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्राधुरभावामुळे क्रिकेटचे अनेक सामने रद्द करण्यात आले होते. परंतु येत्या ३० जुलै पासून आयसीसीच्या बहुचर्चित ODI Super League ला सुरुवात होणार आहे. २०२३ साली भारतात होणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ODI Super League ही स्पर्धा प्रत्येक संघासाठी महत्वाची असणार आहे. अखेर चार महिन्यांनंतर क्रिकेटचे सामने प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार असले तरी आपला भारतीय क्रिकेट संघ मात्र डिसेंबर महिन्यापर्यंत मैदानात दिसणार नाही. तेव्हा भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांना अजून काही काळ आपल्या लाडक्या खेळाडूंची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News