VIRALSATYA : अबब ! 14 वर्षांच्या मुलानं घटवलं 108 किलो वजन

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020
  • 14 वर्षांच्या मुलानं घटवलं 108 किलो वजन
  • 193 किलो वजनामुळं बसणंही झालं होतं अवघड  
  • 108 किलो वजन घटवण्यामागचं सत्य काय ?

वय अवघं 14 वर्ष...पण वजन 193 किलो...एवढ्या वजनामुळं तो त्रस्त झाला होता...अगदी बसायचं किंवा उठायचं म्हटलं तरी त्याला दोन माणसं मदतीला लागायची...पण, आता तोच दुसऱ्यांना मदत करतोय...असं काय केलं त्याने तुम्हीच बघा...

14 वर्षे आणि 193 किलो वजन हे ऐकूनच तुम्हाला विश्वास बसणार नाही...पण, याला बसायचं असेल तर बसवण्यासाठी दोन माणसं लागायची.. पण, आता हा स्वत:च उठतो, बसतो, बाहेर फिरतोही...कारण, यानं तब्बल 108 किलो वजन घटवलंय...इंडोनेशियाचा रहिवाशी असलेला आर्या परमाना हा चार वर्षांपूर्वी त्याच्या वजनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला होता...14 वर्षांच्या आर्याचं वजन 193 किलो होतं...पण, आता पाहिलं तर आर्याला ओळखणंही अवघड होतंय...


108 किलो वजन घटवलं !

2016 सालातील आर्या 193 किलोचा होता...आणि 85 किलोचा आर्या बघा...व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत याने वजन कमी करण्यासाठी किती कष्ट घेतलेयत हे दाखवण्यात आलंय...आर्या 10 वर्षाचा असताना 2016 मध्ये त्यानं वजन कमी करण्यासाठी मेहनत सुरू केली...डाएट आणि नियमित व्यायाम सुरु केला...

 

त्याचदरम्यान त्वचा काढून टाकण्यासाठी त्याच्यावर सर्जरीही करावी लागली...सुरुवातीला आर्यानं सहज करता येईल असेच व्यायाम केले...त्यानंतर ट्रेनरनं अवघड व्यायामही शिकवले...हे नित्यनियमाने सुरू ठेवल्यामुळं 108 किलो वजन घटवण्यात आर्याला यश आलं...

जन्म झाला त्यावेळी आर्याचे वजन साडेतीन किलो इतकं होतं...पण 2014 नंतर त्याचं वजन इतकं वाढलं की वजनाची वाढ अनियंत्रित होती...त्यामुळं आर्यानं स्वत: मेहनत घेऊन आपलं वजन नियंत्रणात आणलंय...त्यामुळं 193 किलोच्या आर्याचं वजन 85 किलो झाल्यानं तो सगळी कामं स्वत:च करतो...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News