भारतात आहे विनानावाचं रेल्वे स्टेशन; मग लोक जातात कुठे?

यिनबझ टीम
Sunday, 23 February 2020

पश्चिम बंगालच्या पूर्बा वर्धमान जिल्ह्यात असलेल्या दोन गावात एक अजब प्रकार पाहायला मिळेल, तो म्हणजे बिना नावाचं स्टेशन. 

उत्तर प्रदेशमधील मुगलसराय रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याबाबत नुकतेच बरेच वाद निर्माण झालेत. त्यामुळे केंद्र सरकारने या स्थानकाचे नाव मुगलसराय बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे ठेवले आहे. भारतात सात हजाराहून अधिक रेल्वे स्थानके आहेत. जवळजवळ सर्व स्थानकांची नावे आणि कोड आहेत. पण देशात असं एक रेल्वे स्टेशन आहे, ज्याला नावच नाही. हे तुम्हाला खोटं वाटेल पण हे खरं आहे, पश्चिम बंगालमध्ये एक रेल्वे स्टेशन आहे ज्याचे नावच नाही.

आता तुम्ही विचार कराल की हे नेमकं असं का? तर या मागची कहाणी पहिला आपण जाणून घेऊ, हे रेल्वे स्थानक पश्चिम बंगालमधील बर्धमानपासून सुमारे 35 कि.मी. अंतरावर आहे. हे रेल्वे स्टेशन रैना आणि रैनागड या दोन खेड्यांमध्ये वसलेले आहे. रेल्वे स्टेशन बांकुरा-मसाग्राम रेल्वे मार्गावर वसलेले हे स्टेशन रैनागड म्हणून ओळखले जात असे, रैना गावातील लोकांना ही गोष्ट आवडली नाही आणि स्टेशनच्या नावावरुन दोन्ही खेड्यांमध्ये भांडण सुरू झाले. या स्थानकाची इमारत रैना गावाच्या जमिनीवर बांधली गेली होती, त्यामुळे या स्टेशनचं नाव रैना असावं असं इथल्या लोकांचं मत होतं.

स्टेशनच्या नावासंदर्भात हे भांडण रेल्वे बोर्डाकडे गेले, भांडणानंतर भारतीय रेल्वेने येथे बसवलेल्या सर्व साइन बोर्डमधून स्थानकाचे नाव काढून टाकले, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे तिथल्या इतर लोकांना या स्टेशनचं नाव काय, असा सवाल विचारावा लागत आहे. तोपर्यंत भांडण संपत नाही, तोपर्यंत स्टेशनसाठी तिकिटे रैनागडच्या नावाने काढली जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे स्टेशनच्या नावावरून सुरू असलेला वाद; कधी संपेल हे त्या दोन्ही गावातील लोकच सांगू शकतील, तोपर्यंत आम्ही स्टेशनचे बोर्ड बिनानावाचे ठेवू असं, घोषित केलय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News