विनायकराव पाटील स्मृती समारोह गुरुवारपासून

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 December 2019

औरंगाबाद: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक (कै) विनायकराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देवगिरी महाविद्यालयात गुरुवार (ता. 26) स्मृतिसमारोहाचे उद्‌घाटन मुंबई विद्यापीठातील संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल इंगळे यांच्याहस्ते होणार आहे. उद्‌घाटनानंतर डॉ. इंगळे गझल सादर करणार आहेत. अध्यक्षस्थानी मशिप्र मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण असतील. प्रमुख पाहुणे पंडितराव हर्षे, निलिमा सावंत उपस्थित असणार आहे.

देवगिरी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी आय. टी. एम. एस. महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, जे. पी. एन. अध्यापक महाविद्यालय, यांच्यातर्फे देवगिरी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय काव्यवाचन, वादविवाद, वक्‍तृत्व व सुगम गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे 42 वे वर्ष असून एकूण 21 पारितोषिके आणि एक लाख रुपये रकमेची बक्षीसे, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

वादविवाद स्पर्धेचा विषय "आजची समाज माध्यमे आपल्याला असामाजिकतेकडे नेत आहेत/ नाहीत. वक्तृत्व स्पर्धेसाठी मी शेतकरी बोलतोय..., आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकारः यशवंतराव चव्हाण, महिला सबलीकरण : वास्तव आणि व्यथा, भारतीय अर्थव्यवस्थेचा घटता विकास दर, स्किल इंडिया विकास योजनेचे वास्तव असे विषय आहेत.

स्पर्धेतील सहभागाचे आवाहन निमंत्रक प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, डॉ. पी. व्ही. अष्टेकर, डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. भास्कर जाधव, डॉ. संदीप धिरडे, संयोजक प्रा. संभाजी कमानदार, प्रा. रवींद्र पाटील, डॉ. जिजा शिंदे यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News