विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर येथे सेवानिवृत्तीचा सोहळा

निखिल ठाकरे
Saturday, 3 October 2020

महाविद्यालयाचे प्राचार्य मा.राजविलास कारमोरे, उपप्राचार्य नयना शिरभाते, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर येथे सेवानिवृत्तीचा सोहळा

समुद्रपूर: विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूर येथील कनिष्ठ लिपिक विठ्ठल धावडे हे सेवामुक्त झाले. वयाचे काही वर्ष प्रामाणिकपणे सेवा देऊन आज सेवानिवृत्त झाल्यामुळे धावडे यांना विद्या विकास महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर तथा कर्मचारी वर्गाने शाल श्रीफळ देऊन निरोप दिला. त्यांना व त्यांच्या परिवाराच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. 

यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य मा.राजविलास कारमोरे, उपप्राचार्य नयना शिरभाते, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

- निखिल ठाकरे

विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News