साडी, शूजवरती नाचणा-या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिला का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020

साडी, शूजवरती नाचणा-या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिला का ?

साडी, शूजवरती नाचणा-या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिला का ?
आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करत असतो, परंतु तो व्हिडिओ इतका व्हायरल होईल असं कोणालाही वाटतं नसतं. अनेक लोकांना हटके काम करायला आवडतात असे व्हिडीओ अधिक व्हायरल होतात. हुला हूप या खेळाचे अनेक मजेदार व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. रब्बर किंवा प्लॅस्टीकची बांगडीसारखी मोठी रिंग कमरेमध्ये गोलगोल फिरत बॅलेन्स करण्याचा हा खेळ कोणत्या नवख्या व्यक्तीचं काम नाही. कारण इतका बॅलेन्स ठेवणं कोणालाही शक्य होत नाही. अनेकांना एखादं सेंकद सुध्दा हे करता येत नाही. पण व्हिडीओतल्या तरूणीने हुला हूपचा खेळ साडी नेसून केला आहे. हा एक मोठा पराक्रम केल्याचं सोशल मीडियावरती अनेकांचं मत आहे.  दिल्ली सिक्समधील गेंदा फूल गाण्यावर साडी नेसून तरूणीने डान्स केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी तरूणीचं कौतुक केलं आहे.
 
या तरूणीने केवळ कंबरेतच नाही तर हातावर, मानेत, पायावरही ही तरुणी नाचता नाचता ही रिंग बॅलेन्स केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या सादरीकरणानंतर ही तरूणी ब्रेक डान्सच्याही काही स्टेप्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ रचना कनवर यांनी ट्विट केला असून बारा तासांमध्ये तो चार हजारहून अधिक जाणांनी शेअर केला आहे. “जेव्हा साडी आणि स्पोर्ट शूट गेंदा फूल गाण्याच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा असं काहीतरी घडलं असं व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.
 
अपर्णा जैन यांनी या व्हिडिओमधील तरूणी ही द हिंदूच्या पत्रकार चित्र नारायणन यांची मुलगी असल्याचे म्हटले आहे. इशना असं त्या मुलीचं नाव असून ती हुला हूपची मास्टर आहे. अनेक वर्षांपासून ती साडी आणि शूज घालून सराव करत आहे. तीचे साडी नेसलेले हूपचे व्हिडीओ पाहा जबरदस्त आहेत असं अपर्णा यांनी म्हटलं आहे.
 
“सकाळी उठले तेव्हा अनेकांनी मला व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ पाठवल्याचे लक्षात आले. ही आहे माझी मुलगी जिने ट्विटवरुन साडी फ्लो हा ट्रेण्ड सुरु केला आहे,” असं म्हणत चित्रा यांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.
 
हा व्हिडीओ माझ्यापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला असं वाटतंय, त्यामुळे मला कमी आश्चर्य वाटलं आहे. शुक्रवारची सुरूवात इतकी चांगली होईल असं मलाही वाटलं नव्हतं. व्हिडीओसाठी धन्यवाद असं महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News