तरुणीचा 'हा' मुजऱ्याचा व्हिडीओ होतोयं सोशल मीडियावर व्हायरलं    

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 February 2020
  • हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आहे, की प्रत्येकाच्या स्टेटसला हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

मुंबई : भारतात दिवसेंदिवस टिकटॉकचे वेड वाढताना दिसत आहे. टिकटॉकच्या माध्यमातून रातोरात स्टार झालेली अनेक उदाहरणे देखील आपल्याकडे आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रात एका मुजऱ्याच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. हा टिकटॉक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आहे, की प्रत्येकाच्या स्टेटसला हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे १९ फेब्रुवारीला येणारी शिवजयंती..! या व्हिडिओमध्ये एक तरुणी लाल रंगाच्या नऊवारी साडीमध्ये चालताना दिसत आहे. तिच्यासमोर येणारा प्रत्येकजण मुजरा करतोय किंवा नमस्कार करून जात आहे.

मात्र दुसऱ्याच क्षणी कॅमेरा फिरतो आणि सर्वजण तरुणीला मुजरा का करत आहेत, याचा खुलासा करण्यात येतो. त्या तरुणीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे, आणि प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून मुजरा करत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने लाईक्स दिले आहेत. 

 

१९ फेब्रुवारीला येणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या टिकटॉक व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.  शिवप्रेमींकडून या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.

शिवजयंतीनिमित्त छत्रपती महाराजांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. मात्र यावेळी राज्यात या नऊवारी साडीतील तरुणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News