VIDEO : टिक-टॉकवर तरुणाच्या मृत्यूचा व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020
  • अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या टिकटॉकने आजवर अनेक तरुणांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आहे. भारतात तर टिकटॉकला प्रचंड पसंती आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे टिकटॉक स्टार कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत, मागे-पुढे पाहत नाहीत. या व्हिडीओ काढण्याच्या सवयीमुळे अनेक टिकटॉक स्टारचे जीव देखील धोक्यात गेले आहेत

मुजफ्फरनगर: अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या टिकटॉकने आजवर अनेक तरुणांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आहे. भारतात तर टिकटॉकला प्रचंड पसंती आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे टिकटॉक स्टार कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत, मागे-पुढे पाहत नाहीत. या व्हिडीओ काढण्याच्या सवयीमुळे अनेक टिकटॉक स्टारचे जीव देखील धोक्यात गेले आहेत.अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे घडली आहे.

टिक-टॉक व्हिडिओ बनविण्याच्या नादात एका तरुणाने आपला जीव गमावला असून त्याच्या मृत्यूचाच व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद  झाला आहे. हा तरुण १८ वर्षाचा असून तो आपल्या मित्रांसोबत टिक-टॉक व्हिडिओ बनवत होता. त्यावेळी तो उंचावरून पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याच्या मित्राने त्याला तसे करण्यास मनाई केली. परंतु त्याने कोणाचही न ऐकता उंचावरून पाण्यात उडी मारली. आणि काही क्षणातच त्याचं शरीर पाण्यावर तरंगू लागलं. त्याचं पाण्यावरच तरंगत शरीर बघून काही वेळासाठी त्याच्यासोबत व्हिडिओ काढणारा मित्रही गांगरून गेला.पाण्यात उडी मारल्यानंतर एखाद्या दगडावर डोकं आदळल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी आपला जीव गमवावा लागेल,अशी कल्पनाही या तरुणाने केली नसावी.  तरुणाच्या या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News