राम मंदीरावर केलेल्या शरद पवार यांच्या व्यक्तव्याचा निषेध करीत भाजपा कडून राज्यव्यापी आंदोलन

Thursday, 23 July 2020

येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदीराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यावर शरद पवार यांनी नुकतीच टिका केली होती. राम मंदीराचे भूमिपुजन करून देशातील कोरोना नष्ट होणार नसल्याची उपहासात्मक टिका शरद पवार यांनी केल्या नंतर या विरोधात आता भाजपा युवा मोर्चा मैदानात उतरली आहे. शरद पवार यांच्या व्यक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा यांनी निषेध करीत पवार यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राम मंदीर ही देशाची, भाजपाची अस्मिता आहे.

<p class="rtejustify"><font style="background-color: rgb(255, 255, 255);">येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदीराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यावर शरद पवार यांनी नुकतीच टिका केली होती. राम मंदीराचे भूमिपुजन करून देशातील कोरोना नष्ट होणार नसल्याची उपहासात्मक टिका शरद पवार यांनी केल्या नंतर या विरोधात आता भाजपा युवा मोर्चा मैदानात उतरली आहे. शरद पवार यांच्या व्यक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा यांनी निषेध करीत पवार यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राम मंदीर ही देशाची, भाजपाची अस्मिता आहे. मंदीराच्या भूमिपुजनावरून देशात आनंदाचे वातावरण असताना शरद पवार यांनी सदरचे व्यक्तव्य म्हणजे एखांद्या समाजाला खुश करण्याचा प्रयत्न आहे. असा आरोप भाजपा युवा मोर्चाकडून&nbsp; करण्यात आला आहे. शरद पवार यांना रामाची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील घरी राज्यभरातून १० लाख पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याची सुरवात पनवेल येथून केली आहे.</font></p>