सोलापूर मध्ये 'मार्कंडेय एक्सप्रेस' रेल्वे गाडीत भरणार शाळा...

Wednesday, 12 August 2020

एखादी शाळा रेल्वेत भरणार आहे म्हटलं, तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे, सोलापूर शहरातील कुचन प्रशाळामधील शाळेतील वर्ग खोल्यांचे रुपडे पालटले आहे. येथील वर्ग खोल्यांना रेल्वेचे रूप देण्यात आले आहे. चक्क रेल्वेचे प्रतीकात्मक रूप वर्गखोल्यांवर रंगवून जणू शाळा रेल्वेत असल्याचा भास होतो. सोलापूर शहराच्या पूर्व भागातील कुचन प्रशालेमधील कला शिक्षक नितीन मिरजकर यांच्या कल्पनेतून वर्गांची रंगसंगती करण्यात आली, शाळेमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'सुपर सेमी एक्सप्रेस' असे क्लास सुरु करण्यात आले आहेत.

<p class="rtejustify">एखादी शाळा रेल्वेत भरणार आहे म्हटलं, तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे, सोलापूर शहरातील कुचन प्रशाळामधील शाळेतील वर्ग खोल्यांचे रुपडे पालटले आहे. येथील वर्ग खोल्यांना रेल्वेचे रूप देण्यात आले आहे. चक्क रेल्वेचे प्रतीकात्मक रूप वर्गखोल्यांवर रंगवून जणू शाळा रेल्वेत असल्याचा भास होतो. सोलापूर शहराच्या पूर्व भागातील कुचन प्रशालेमधील कला शिक्षक नितीन मिरजकर यांच्या कल्पनेतून वर्गांची रंगसंगती करण्यात आली, शाळेमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'सुपर सेमी एक्सप्रेस' असे क्लास सुरु करण्यात आले आहेत. &nbsp;खास त्या विद्यार्थ्यांकरिता ही 'मार्कंडेय एक्सप्रेस' सजून तयार झाली आहे. आणि शाळा नियमित सुरु होताच विद्यार्थी ही या रेल्वे शाळेत येण्या करिता उत्सुक असल्याच चित्र पाहायला मिळत आहे. &nbsp;शहरातील गरीब, होतकरू विडीकामगार, यंत्रमाग कामगारांची मुले या शाळेमध्ये शिक्षण घेतात, त्यामुळे त्यांना कोरोना नंतर सकारात्मक वातावरणात शिक्षण घेता यावं म्हणून शाळेने उचलेल हे एक सकारात्मक पाऊल आहे.</p>