पूना कॉलेजतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा

Friday, 23 October 2020

पूना कॉलेजतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा

<h1>पूना कॉलेजतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा</h1> <p>पुणेः पूना कॉलेजतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. हा दिवस विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्ये पुस्तके वाचून साजरा केला. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित पोस्टर्स आणि घोषणा पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्राध्यापक असद शेख, प्राध्यापक अमित खराडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास मार्गदर्शन केले. अल्फिया सय्यद, दर्शन कोटीयन, नासिर शेख यांनी मराठीत वाचन केले. हिंदी मध्ये शंतनु म्हस्के, साजिद खान, हसन खान यांनी वाचन केले. मरीन शेख यांनी उर्दू भाषेत तर अमन फिरोज आणि सपुरा पटेल या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत वाचन केले. याप्रसंगी महाविद्यालय प्राचार्य डॉ. अनवर शेख यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून आपले जीवन आणि आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मार्गदर्शन केले.</p>