खेड तालुक्यात कोरोनाचा रूग्णांचा आकडा प्रचंड मोठ्या संख्येने वाढत आहे

Sunday, 12 July 2020

वाहन उद्योगांची पंढरी म्हणून लौकिक असलेल्या चाकण एमआयडीसी भागात आणि खेड तालुक्यात कोरोनांचा आकडा प्रचंड मोठ्या संख्येने वाढत असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. आज सकाळपर्यंत खेड तालुक्यातील एकूण कोरोना रूग्णांचा आकडा ३५२ वर जाऊन पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे चाकण नगर पालिका हद्दीत काल एकाच दिवसात तब्बल पंधरा जणांना कोरोना संसर्ग झाल्याची अत्यंत धोकादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे चाकण मधील एकूण कोरोना रूग्णांचा आकडा त्रेपन वर जाऊन पोहोचला आहे.

 

<p class="rtejustify">वाहन उद्योगांची पंढरी म्हणून लौकिक असलेल्या चाकण एमआयडीसी भागात आणि खेड तालुक्यात कोरोनांचा आकडा प्रचंड मोठ्या संख्येने वाढत असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. आज सकाळपर्यंत खेड तालुक्यातील एकूण कोरोना रूग्णांचा आकडा ३५२ वर जाऊन पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे चाकण नगर पालिका हद्दीत काल एकाच दिवसात तब्बल पंधरा जणांना कोरोना संसर्ग झाल्याची अत्यंत धोकादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे चाकण मधील एकूण कोरोना रूग्णांचा आकडा त्रेपन वर जाऊन पोहोचला आहे.</p> <p class="rtejustify">&nbsp;</p>