औसा पोलिसांची गल्लीबोळातल्या टवाळखोर फिरस्त्यावर कारवाई

Monday, 27 July 2020

लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी १५ जुलै ते ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. दरम्यान २५ जुलैपर्यंत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. पण नियमांचे पालन होत नसल्याने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला. औसा शहरात देखील दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने औसा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत शहराच्या मुख्य रस्त्यासह राज्य महामार्गावर लॉकडाऊनची कडक अमंलबजावणी सुरु आहे.

<p class="rtejustify">लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी १५ जुलै ते ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. दरम्यान २५ जुलैपर्यंत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. पण नियमांचे पालन होत नसल्याने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला. औसा शहरात देखील दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने औसा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत शहराच्या मुख्य रस्त्यासह राज्य महामार्गावर लॉकडाऊनची कडक अमंलबजावणी सुरु आहे. पण औसा शहरातील गल्ली बोळात टवाळखोर तरुण मुले विनाकारण एकत्र जमून बसत असल्याची स्थिती होती यावर औसा पोलिसांची नजर गेली अन काय मग दिसले कार्टे ओट्यावर की पोलिसांचा दे दणका सुरु झाले. मग काय टवाळखोरांची हवाच झाली की टाईट &nbsp;सगळेच सापडेल. त्या वाटेने धावत पळू लागले यामुळे गल्लीबोळातले बिनकामाचे आता स्वतःलाच लॉकडाऊन करुन घेण्याशिवाय पर्याय नाही. जनजागृती आणि पेट्रोलिंगच्या माध्यमातून औसा पोलिसांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली अन शहरच नव्हे तर गल्लीबोळातही लॉकडाऊन यशस्वी केला. औश्याच्या नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक नरसिंग ठाकुर यांनी केले आहे.</p>