अकोल्यात ३४ तळीरामाना पोलिसांनी पकडले, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत पीत होते दारू

Monday, 27 July 2020

ग्राहकांना मद्य पिण्यासाठी अवैधरित्या जागा उपलब्ध करून देणाऱ्या अकोल्यातील राष्ट्रीय महमार्गागावरील कलकत्ता हॉटेलवर आज रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या विशेष पथकानं छापा मारला. या कारवाईत हॉटेलचालकासह तब्बल ३४ तळीरामाना ताब्यात घेण्यात आले. सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पायदळी तुडवत अनेक जण मद्य प्राशन करत होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल वर छापा टाकला दरम्यान विनापरवाना अनेक जण दारू पित असल्याचे दिसून आले. सर्वाना ताब्यात घेत त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

<p class="rtejustify">ग्राहकांना मद्य पिण्यासाठी अवैधरित्या जागा उपलब्ध करून देणाऱ्या अकोल्यातील राष्ट्रीय महमार्गागावरील कलकत्ता हॉटेलवर आज रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या विशेष पथकानं छापा मारला. या कारवाईत हॉटेलचालकासह तब्बल ३४ तळीरामाना ताब्यात घेण्यात आले. सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पायदळी तुडवत अनेक जण मद्य प्राशन करत होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल वर छापा टाकला दरम्यान विनापरवाना अनेक जण दारू पित असल्याचे दिसून आले. सर्वाना ताब्यात घेत त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होवू नये सोशल डिस्टन्सचे नियम पाळून हॉटेल्सना परवानगी देण्यात आली &nbsp;आहे. मात्र, अकोला शहरातील अनेक हॉटेलमध्ये अवैधरीत्या तळीरामांना दारू पिण्याची सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळ या ठीकाणी सोशल डिस्टसिंगचे अक्षरक्षा फज्जा उडत असल्याचे चित्र दिसत आहे. आता अशा हॉटेल अकोला पोलिसांनी नोटिस बजावत कारवाई करणे गरजेचे &nbsp;आहे.</p>