छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याच्या साक्षीने विवाह

Monday, 28 January 2019

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने सोमवारी पुजा आणि प्रदीप विवाहबंधनात अडकले. शहरातील एका कार्यालयात आज त्यांचा साखरपुडा सुरु होता. पै पाहूणे, मित्रमंडळी जमले होते. याचवेळी लग्नाचा वारेमाप खर्च टाळण्यासाठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुढाकार घेत लग्न करण्याचे सुचविले. कुटूंबियांनीही तत्काळ होकार दिला. टीव्ही सेंटर येथील चौकात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याच्या साक्षीने हे लग्न झाले. अडीचशेपेक्षा जास्त वऱ्हाडी उपस्थित होते.
(व्हिडिओ : अतुल पाटील)

<p>औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने सोमवारी पुजा आणि प्रदीप विवाहबंधनात अडकले. शहरातील एका कार्यालयात आज त्यांचा साखरपुडा सुरु होता. पै पाहूणे, मित्रमंडळी जमले होते. याचवेळी लग्नाचा वारेमाप खर्च टाळण्यासाठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुढाकार घेत लग्न करण्याचे सुचविले. कुटूंबियांनीही तत्काळ होकार दिला. टीव्ही सेंटर येथील चौकात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याच्या साक्षीने हे लग्न झाले. अडीचशेपेक्षा जास्त वऱ्हाडी उपस्थित होते.<br /> (व्हिडिओ : अतुल पाटील)</p>