video : म्हणून corona virus च्या पेशंटवर उपचार करणारे डॉक्टर लागले नाचायला

यिनबझ टीम
Friday, 6 March 2020

सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. चीनच्या वुहान शहरापासून पसरलेल्या या व्हायरसची आज जगभरातील लोकांना लागण झाल्याचे पाहायला मिळते. भारतातदेखील याचे काही रुग्ण अढळले आहेत. या व्हायरसच्या भितीपोठी काही लोक एकमेकांना हात मिळवण्यास देखील घाबरत आहेत. हे सगळं भितीचं वातावरण पसरलं असतानाच दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

तासंनतास पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्वत:च्या आयुष्यातले खूप क्षण हातून सोडले. दिवसरात्र पेशंटसोबत राहिलेल्या डॉक्टरांनी स्वत:च्या मनोरंजनासाठी त्यांच्या ब्रेकटाईममध्ये मास्क लावून डान्स करायचं ठरवलं आणि त्यांचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले.

Negar Mortazavi नावाच्या ट्विटर युजरने आपल्या ट्विटर हँडलवरून हे व्हिडीओ शेअर करत 24 तास काम करणाऱ्या डॉक्टरांनाही आरामाची गरज आहे, असं त्याचं मत आहे. कोरोना व्हायरसमुळे डॉक्टरांना खूप मोठ्या शिफ्ट कराव्या लागत आहे, त्यामुळे त्यांचं वेळ मिळेल तसं मनोरंजन व्हावं, या कारणामुळे त्यांनी डान्स करण्याचा विचार मनात आणला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News