रिया चक्रवर्ती आणि महेश भट्टचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
सुशांत सिंग राजपूर आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस नव्याने वळण घेत असल्याचे आपण पाहतोय, रिया चक्रवर्ती सुशांतची गर्लफ्रेंड हिच्यावर पैशाची गफलत केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. तसेच मुंबई पोलिस योग्य पध्दतीने तपास करत नसल्याचे सुध्दा सुशांतच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यातचं बिहारचे पोलिस मुंबईत तपासासाठी आल्याने मोठा पेच वाढला होता. या प्रकरणाच राजकारण सुध्दा केलं जातंय असं काहीजणाचं म्हणणं आहे. हे सगळं सुरू असताना रिया चक्रवर्ती आणि महेश भट्टचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. त्याचबरोबर व्हाट्सअप्प चॅट सुध्दा चौकशीत समोर आलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हि़डीओ जलेबी चित्रपट प्रमोशनच्या वेळेचा असून त्यात महेश भट्ट रियाचा हात घट्ट पकडून प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत. त्याचवेळी महेश भट्टचा हात हातात असतात रिया प्रेम, नातेसंबंध याबाबत बोलत आहे.
रियाच्या म्हणण्यानुसार प्रेमात एकवेळ अशी येते की, एक दोन वर्षात एकामेकाला मारून टाकावसं वाटतं किंवा बदलावसं वाटतं. हे सामान्य असून याचं एक चक्र सुध्दा असतं. रियाच्या मते प्रेमात खूप जवळीकता वाढली, की ते रिअल झालं असं अनेकांना वाटतं आणि याचा अर्थ असाही होतो की मी आयुष्यभर मी एकटाच राहीन.
जेव्हा रियाने सुशांत सिंग राजपूतचं घर सोडलं होतं. त्यावेळी तिने महेश भट्टला व्हॉट्सअप्प केला होता. हा मेसेज सुध्दा त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामध्ये रियाने मूव्ह ऑन असं म्हटलं होतं. त्यावर महेश भट्टने उत्तर असं दिलं होतं, की तुझे वडिल या निर्णयाने प्रचंड खुश होतील. आता मागे वळून पाहू नकोस असा सल्लाही महेश भट्टने रियाला दिला होता.
सध्या हे प्रकरण अधिक तेजीत असल्याने पाहायला मिळत आहे. कारण सीबीआयचे अधिकारी गुरूवारी मुंबईत दाखल झाले आहेत. हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात दिल्यानंतर तपास अधिक जलद गतीने होईल असं चाहत्याचं म्हणणं आहे. कोणत्याही क्षणी रियाला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे रिया आणि सुशांत मित्र असलेल्या महेश शेट्टीला सुध्दा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.