video: राष्ट्रवादी युवा कार्यकर्त्यांचे जोडे मारो आंदोलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 January 2020
  • 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरून मुखपुष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला आहे, त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.

उस्मानाबाद: 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकाच्या मुखपुष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला आहे, त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक- युवती कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते जयभगवान गोयल यांचा पुतळा जाळून जोडे मारो आंदोलन केले. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
 

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक सरकाने परत घ्यावे, तसेच बाजारात पुस्तक उपलब्ध झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस युवकांचे प्रदेशाध्यक्ष माहेबूब शेख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, विध्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंतनू खंदारे, आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News