अंमली पदार्थ प्रकरणी करण जोहरचा व्हिडीओ एनसीबीकडे; 'या' दिग्गज कलाकारांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 13 September 2020

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलिबूडमधील 80 टक्के जनता अंमली पदार्थाचे सेवन करते. करण जोहरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विकी कौशल्य जवळ पाढऱ्या रंगाचा अंमली पदार्थासारखा घटक दिसत आहे. याचा अर्थ विक्की कौशल्यने ड्रग्स सेवन केले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

मुंबई: सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अंमली पदार्थ प्रकरणात पाच प्रमुख व्यक्तीचे नाव घेतले. त्यात अभनेत्री सारा अली खान, अभिनेत्री कुलप्रीत सिंह, डिझायनर सिमोन खांबाटा, सुशांतचा व्यवस्थापक, 'दिल चाहता है' चित्रपटाचा निर्माता मुकेश चाब्रा यांच्या नावांचा समावेश आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलिबूडमधील 80 टक्के जनता अंमली पदार्थाचे सेवन करते. करण जोहरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विकी कौशल्य जवळ पाढऱ्या रंगाचा अंमली पदार्थासारखा घटक दिसत आहे. याचा अर्थ विक्की कौशल्यने ड्रग्स सेवन केले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. एसीबी या व्हिडीओची कसून चौकशी केली आहे. काही दिवसात खर काय ते स्पष्ट होईल. मात्र अंमली पदार्थ प्रकरणात एकून 25 बॉलिवूड करांची नावे असल्याचे स्पष्ट झाले.    

काय आहे व्हिडीओत

काही वर्षापुर्वी सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने आपल्या राहत्या घरी एक पार्टी आयोजिक केली होती. या पार्टीचा व्हिडीओ करणने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर कपूर, विकी कौल्यल, अर्जून कपूर, शाहिद कपूर, वरुन धवल, अभिनेत्री दिपिका पादूकोन, मलायला अरोरा  झोया अक्तर, विकी कौल्यल आर्यन मुकेरजी, मीरा राजपूत, शकून भद्रा आणि व्हिडीओ रेकॉर्ड करणार करण जोहर होता. सर्वजन नेशत मद्यधुंद असल्यासारखे दिवस आहेत, काही कॉमेऱ्याला पाहून विचकाळल्यासारखे करत होते. विकी कौल्यलच्या बाजूला पाढऱ्या रंगाचा पदार्थ ठेवलेला स्पष्ट दिसत आहेत. तो अंमली पदार्थ असल्याचे प्राथमिक अंदाजावरून वाटते. हा व्हिडीओ पाहून जनतेने जोरदार टिका केली. काही लोकप्रतिनिधींनी कार्यवाही करण्याचे आदेश दिले मात्र, व्हिडीओत सुप्रसिद्ध निर्माता, कलाकार असल्यामुळे कोणतीही कार्यावाही झाली नाही. हा व्हिडीओ आता 'नार्कोटींग कंट्रोल ब्युरो' (NCB) संस्थेच्या हाती लागला आहे. एससीबीने या व्हिडीओची कसून चौकशी सुरु केली. अंमली पदार्थ प्रकरणात कोण कोणते मासे गळाला लागणार हे येणाऱ्या काळात निश्चित होईल.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News