Video : AAP ला कतरीनाच्या झाडू मारून शुभेच्छा...

यिनबझ टीम
Wednesday, 12 February 2020

देशाचं लक्ष लागून असलेल्या दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा आपचे सरकार आले आहे. 70 पैकी 62 जागांवर जिंकून येत पुन्हा एका भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांना आपने पिछाडीवर सोडले आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांसह आपचे देशभरातून कौतूक केले जात आहे.

दिल्ली - देशाचं लक्ष लागून असलेल्या दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा आपचे सरकार आले आहे. 70 पैकी 62 जागांवर जिंकून येत पुन्हा एका भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांना आपने पिछाडीवर सोडले आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांसह आपचे देशभरातून कौतूक केले जात आहे.

आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवल्याने कार्यकर्ते आणि अनेक समर्थकांनी जल्लोषाला सुरूवात केली आहे. सोशल मीडियावरदेखील याची धूम मोठ्याप्रमाणात पाहायला मिळत आहे. त्याच्यात बॉलिवडूच्या अभिनेत्रींनीदेखील सहभाग नोंदवला आहे.

सोशल मिडीयावरदेखील असाच एक आपचे कौतूक करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक सोशल मिडीया वापरकर्तेदेखील हा व्हिडीओ शेअर करत आपचे कौतूक करत आहेत. या व्हिडीओमध्ये कैटरीना कैफ हातात झाडू (आप पक्षाचे निवडणुक चिन्ह) घेऊन अरविंद केजरीवालांना शुभेच्छा देत असल्याचे दाखवले आहे.

अमजाद इस्मिल नावाच्या तरुणांने अरविंद केजरीवालांना टॅग करून हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. सोबतच कैटरीना कैफनेदेखील तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि झाडू मारून आनंद व्यक्त केला आहे, अशा शब्दात कॅप्शन दिले आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सुर्यवंशी चित्रपटातला आहे. हा व्हिडीओ सुरूवातीला अक्षय कुमारने कॅटरिनाला स्वच्छ भारत अभियानची एंबेस्डर म्हणून शेअर केला होता. त्यांचा आगामी चित्रपट येत्या 27 मार्च 2020 रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News