विदर्भ-गुजरातचा उपांत्यपूर्व सामना आजपासून रंगतोय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

नागपूर : रणजी व कुचबिहार करंडकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर विदर्भाच्या सर्व आशा आता २३ वर्षांखालील मुलांच्या कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेवर टिकून आहे. विजेतेपदाच्या मार्गातील पहिला अडथळा मानला जाणारा गुजरातविरुद्‌धचा चारदिवसीय उपांत्यपूर्व सामना, आजपासून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत केलेली दमदार कामगिरी लक्षात घेता सामना संघर्षपूर्ण ठरण्याची दाट शक्‍यता आहे.

नागपूर : रणजी व कुचबिहार करंडकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर विदर्भाच्या सर्व आशा आता २३ वर्षांखालील मुलांच्या कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेवर टिकून आहे. विजेतेपदाच्या मार्गातील पहिला अडथळा मानला जाणारा गुजरातविरुद्‌धचा चारदिवसीय उपांत्यपूर्व सामना, आजपासून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत केलेली दमदार कामगिरी लक्षात घेता सामना संघर्षपूर्ण ठरण्याची दाट शक्‍यता आहे.

मोहित काळेच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या विदर्भाने साखळी फेरीत आठपैकी पाच सामने जिंकून व तीन अनिर्णीत राखून एलिट ‘अ’ गटात सर्वाधिक ४० गुणांसह अव्वल स्थान पटकाविले होते. स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेला यजमान विदर्भ बादफेरीतही हा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ कायम ठेवण्याच्या इराद्‌याने उतरणार आहे. ‘होमग्राऊंड’ आणि फलंदाज व गोलंदाज फॉर्ममध्ये असल्यामुळे विदर्भाला विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकणे फारसे कठिण जाऊ नये. विदर्भाप्रमाणेच गुजरातनेही साखळी फेरीत शानदार कामगिरी करून इथपर्यंत मजल मारली आहे. एलिट ‘अ’ गटात गुजरातने पाच विजय व तीन अनिर्णीत सामन्यांसह ४० गुणांची कमाई करून थाटात बादफेरी गाठली. त्यामुळे विदर्भाचा संघ प्रतिस्पर्ध्याला हलक्‍याने घेण्याची निश्‍चितच चूक करणार नाही.

विदर्भाला बादफेरीत स्थान मिळवून देण्यात फॉर्ममध्ये असलेला यष्टीरक्षक सिद्‌धेश वाठ, अथर्व तायडे, सलामीवीर अनिरुद्‌ध चौधरी आणि यश राठोड या फलंदाजांसह युवा मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे, डावखुरा फिरकीपटू पार्थ रेखडे व अष्टपैलू दर्शन नळकांडेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.  वाठने स्पर्धेत चार शतके व दोन अर्धशतकांसह विदर्भाकडून सर्वाधिक ८४३, तायडेने चार शतके व दोन अर्धशतकांसह ७३६ धावा, चौधरीने ५४५ आणि राठोडने ४८३ धावा काढल्या. तर गोलंदाजीत आदित्यने ३१, पार्थने २६ व दर्शनने २२ बळी टिपले. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर चौधरीची रणजी संघात निवड करण्यात आली होती. मात्र रणजी सामन्यांमध्ये तो अपेक्षेवर खरा उतरला नव्हता. त्याचवेळी १९ वर्षांखालील कुचबिहार करंडकात चमकदार कामगिरी करणारा डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेला २३ वर्षांखालील संघात बढती देण्यात आली. हर्षच्या समावेशामुळे विदर्भाचा फिरकी मारा भक्‍कम झाला आहे. विदर्भाच्या खेळाडूंनी संधीचा फायदा घेतल्यास उपांत्यफेरीची संधी मिळू शकते. 

राहुल शाहच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या गुजरातची भिस्त स्वत: कर्णधार शाह, यष्टीरक्षक हेत पटेल, मध्यमगती गोलंदाज जयवीर परमार, वाय. गरधारिया व विशाल जैस्वाल या चार-पाच खेळाडूंवर राहणार आहे. शाहने या स्पर्धेत आतापर्यंत ६४१ व पटेलने ५४२ धावा काढल्या असून, जयवीरने ३२, गरधारियाने २७ आणि जैस्वालने २५ बळी टिपले आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे दोघांनाही विजयाची समसमान संधी राहणार आहे. विदर्भाची ‘स्ट्रेंथ’ फिरकी मारा असल्यामुळे खेळपट्‌टी फिरकीला अनुकूल राहण्याची दाट शक्‍यता आहे. त्या परिस्थितीत नाणेफेकीचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News