विदर्भ क्रिकेट संघात यवतमाळ जिल्ह्यातील दोन खेळाडूंचा समावेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 11 September 2019

यवतमाळ :गुजरात राज्यात बडोदरा येथे मंगळवारपासून (ता.10) सुरू झालेल्या राज्यस्तर क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट संघाची निवड करण्यात आली. या संघात यवतमाळचा श्रीयोग दिनेश पवार तर पुसदचा केदार कैलास जगताप याने संघात स्थान प्राप्त केले आहे. दिवंगत जे वाय लेले अंडर 19 ऑल इंडिया वनडे स्पर्धा ही सुरू झाली. 

स्पर्धेत ए ग्रुपमध्ये सहा व बी ग्रुपमध्ये सहा याप्रमाणे राज्यातील बारा संघाचा समावेश आहे. प्रत्येक संघाला पाच सामने खेळायला मिळणार असून अंतिम सामना 21 सप्टेंबरला होणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून पाठविण्यात आलेल्या संघात मंदार महाले, हर्ष डुबे, अमन मोकाडे, अमन ढेनकर, सुश्रूत बैसवार, संदेश देरुगवार व मनन घोष सर्व नागपूर, श्रीयोग पवार (यवतमाळ), केदार जगताप (पुसद), रोहित दतात्रे (चंद्रपूर), गणेश भोसले (अकोला), शिवम देशमुख (अमरावती), दीपक जांगिड व आवेश शेख (बुलडाणा) इत्यादींचा संघात समावेश आहे. कोच उस्मान गणी, ट्रेनर युवराज, मॅनेजर युसूफ टिम सोबत आहेत. 

यवतमाळ जिल्ह्याचे हे दोन्ही खेळाडू गेल्या अनेक वर्षापासून परिश्रम घेत असून त्यांना विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा समन्वयक बाळू नवघरे यांचे मार्गदर्शन लाभले. 50 षटकाच्या हे सामने पांढर्‍या बॉलने आंतरराष्टीय नियमानुसार खेळले जात आहे. स्थानिकचे आशिष शुक्ला केदार यास गेली दहा वर्षांपूर्वीपासून क्रिकेटचे धडे देत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News