उपराष्ट्रपतीं समोर बालकलाकार चैत्याचे संस्कार!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019

व्यासपिठावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच श्रीनिवासला हा पुरस्कार मिळाला. सूत्रसंचालक सोनाली कुलकर्णी आणि दिव्या दत्ता यांनी जेव्हा श्रीनिवास पोकळेचं नाव घेतलं तेव्हा श्रीनिवास सुरुवातीला व्यासपिठाच्या पाया पडला.

नवी दिल्ली : विज्ञान भवनात आज सोमवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ६६ वा राष्ट्रीय पुरस्कार २०१९ (National Film Awards) विजेत्यांचा सन्मान करण्यात आले. यावेळी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून 'नाळ' सिनेमातील चैत्या अर्थात श्रीनिवास पोकळेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
व्यासपिठावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच श्रीनिवासला हा पुरस्कार मिळाला. सूत्रसंचालक सोनाली कुलकर्णी आणि दिव्या दत्ता यांनी जेव्हा श्रीनिवास पोकळेचं नाव घेतलं तेव्हा श्रीनिवास सुरुवातीला व्यासपिठाच्या पाया पडला. त्यानंतर तो उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. श्रीनिवासच्या या कृतीने उपस्थितांची मनं जिंकली. स्वतः व्यंकय्या नायडू यांनी व्यासपिठावर श्रीनिवासशी गप्पा मारल्या.
विशेष म्हणजे 'नाळ' सिनेमाचे निर्माते नागराज मंजुळे यांनी श्रीनिवासची ही कृती पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या आनंदासोबतच त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भावही लपले नाहीत. एवढ्या छोट्या श्रीनिवासला हे कसं काय सुचलं असेल असाच विचार त्यांनी केला असं वाटतं.
या कलाकारांना दिला जाणार राष्ट्रीय पुरस्कार
दरम्यान, नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या सिनेमाने दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘नाळ’च्या सुधाकर रेड्डी यांनी पटकावला. यासोबतच श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. PIB च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा श्रीनिवासचा हा व्हिडिओ पाहता येईल. 66th National Film Awards Ceremony या व्हिडिओमध्ये ०१ तास ५७ मिनिटं आणि २० सेकंदांवर श्रीनिवास पोकळेच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण पाहता येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News