दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं मोठं विधान...

यिनबझ टीम
Monday, 30 December 2019

23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आले मात्र त्यावेळेस अमिताभ बच्चन यांची  तब्येत बिघडल्यामुळे त्या दिवशी ते येऊ शकले नाहीत.

नवी दिल्ली - भारतीय चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 29 डिसेंबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आले मात्र त्यावेळेस अमिताभ बच्चन यांची  तब्येत बिघडल्यामुळे त्या दिवशी ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर राष्ट्रपतींनी विशेष समारंभ आयोजित करून हा पुरस्कार अमिताभ यांना दिला. या समारंभात जया बच्चन आणि अभिषेक बच्चन हेदेखील उपस्थित होते.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. त्यांच्या अजूनपर्यंतच्या सर्व चित्रपट कारकिर्दीसाठी त्यांच्या सहकारी तसेच चाहत्यांचेदेखील त्यांनी आभार मानले आहेत. अमिताभ म्हणाले, "कुठेतरी हा पुरस्कार मला घरात बसून आराम करण्याचे संकेत देत आहे." अमिताभ यांच्या तब्येतीमुळे ते चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतील, अशा बातम्यादेखील काहीप्रमाणात आल्या होत्या. परंतू माझे काही काम शिल्लक असल्याचेदेखील त्यांनी म्हटले यावेळी आहे.

चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. भारतीय सिनेमा क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार म्हणून याकडे पाहिलं जातं. याची सुरूवात भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने 1969 मध्ये केली होती. पहिल्या वर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी यांना देण्यात आला होता. भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब यांच्या नावे देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात सुवर्ण कमळ, शाल आणि दहा लाख रुपये देण्यात येतात.

1969 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या करिअरची सुरूवात झाली होती. सेव्हन हिंदुस्तानी या चित्रपटातून त्यांनी या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यांचा हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा पहिला यशस्वी चित्रपट जंजीर ठरला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News