व्हेज रोल टिक्की

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
 • लॉकडाऊनमुळे बाहेरी खाण्यावर बंदी आहे, म्हणूनच मी आता तुमच्यासाठी खास व्हेज रोल टिक्कीची रेसिपी घेऊन येत आहे.
 • म्हणजे आता तुम्ही तुमच्या घरी सुध्दा हॉटेलसारखी व्हेज रोल टिक्की करू शकतात.

लॉकडाऊनमुळे बाहेरी खाण्यावर बंदी आहे, म्हणूनच मी आता तुमच्यासाठी खास व्हेज रोल टिक्कीची रेसिपी घेऊन येत आहे. म्हणजे आता तुम्ही तुमच्या घरी सुध्दा हॉटेलसारखी व्हेज रोल टिक्की करू शकतात.

साहित्य :-

 • कोबी (बारीक चिरलेला)
 • गाजर (बारीक चिरलेला)
 • सिमला मिर्ची (बारीक चिरलेला)
 • फरसबी (बारीक चिरलेला)
 • हवा असेल तर कांदा (बारीक चिरलेला)
 • कोथिंबीर (बारीक चिरलेला)
 • ३/४ मध्यम बटाटे उकडून सोलून
 • १.५ कप कणीक
 • तिखट
 • हिरवी मिरची
 • जिरेपूड
 • धनेपूड
 • चाट मसाला
 • चवीनुसार मीठ
 • तेल

कृती :-

उकडलेले बटाटे पोटॅटो राईसर मधून काढावेत किंवा किसून मऊ गोळा करावा, हा जरा मीठ कणकेत घालून, लागलंच तर पाणी, तेल वापरून नेहेमीच्या पोळ्यांच्या कणकेसारखी कणीक भिजवून तयार करून ठेवावी. चिरलेल्या भाज्यांमध्ये हवा तो चवीचा मालमसाला घालून सारण तयार करून घ्यावे.

कणकेची जाडसर मोठी पोळी लाटून त्यात भरपूर सारण भरून रोल तयार करावा. याचे इंचभर जाडीचे काप करून प्रत्येक कापाला जरा दाब देऊन चपटं करावं. ही रोल-टिक्की तयार झाली. अश्या सगळ्या टिक्की तयार करून घ्याव्यात. (बहुधा २ किंवा ३ मोठे रोल्स होतील या साहित्यात) या स्टेजला क्लिंग रॅप लावून फ्रीजमध्ये ठेवता येतील आयत्यावेळी करायला.

एखादे पॅन तापवून त्यात जरा तेल घालून उथळ तळणी करावी आणि प्रत्येक टिक्की दोन्ही बाजूनी खरपूर भाजून-तळून गरमागरमच खायला घ्यावी. सोबत दाल-तडका / माह की दाल, हिरवी चटणी इत्यादी घेता येइल आणि पोटभरीचे जेवणही होईल. गरमागरम खायला तयार आहेत.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News