वेचू कुठे कसा.....

सारिका पाटील, कोल्हापूर 
Tuesday, 26 February 2019

कंठ दाटुन हा आला
क्रूर अन्याय पाहून
हिंस्र श्वापदे धावली
भ्रष्ट नीतीला काहून.

देह चिंधड्या जाहला
वेचू कुठे कसा आता
टाहो फोडतो निसर्ग
घुसे पाशवीच भाता.

दाह देहाचा असह्य
आर्त किंकाळी विरली
देश रक्षिण्या वीराची
काया अग्नीत सरली.

उठे कल्लोळ अंतरी
कृत्य निर्दयी द्वेषाचे,
किती जळाले सैनिक
पती,पिता लेकरांचे.

चिंध्या पाहून देहाच्या
आज धरती फाटली,
माय लेकराची प्रीत
गर्द आक्रंदे छाटली.

कंठ दाटुन हा आला
क्रूर अन्याय पाहून
हिंस्र श्वापदे धावली
भ्रष्ट नीतीला काहून.

देह चिंधड्या जाहला
वेचू कुठे कसा आता
टाहो फोडतो निसर्ग
घुसे पाशवीच भाता.

दाह देहाचा असह्य
आर्त किंकाळी विरली
देश रक्षिण्या वीराची
काया अग्नीत सरली.

उठे कल्लोळ अंतरी
कृत्य निर्दयी द्वेषाचे,
किती जळाले सैनिक
पती,पिता लेकरांचे.

चिंध्या पाहून देहाच्या
आज धरती फाटली,
माय लेकराची प्रीत
गर्द आक्रंदे छाटली.

अशी कशी रे तू देवा
भाळी राख रे फासली,
उर फुटतो पत्नीचा
दुःखे पदरी ठासली.

राखी बहिणीची आता
वाट पाहिल कुणाची
श्वास अंतरी शोधतो
आस धाकट्या बंधूची.

खांदा मोडला पित्याचा
देह लेकराचा नेता,
त्याचे सर्वस्व हरवे
अग्नी चितेस रे देता.

सेवा मातीची करता
माता पोरकी जाहली
पूर अश्रूंचा लोटला
कळ वेदनेत न्हाली.

भ्याड पुलवाम हल्ला
कोण दहशत आहे
वार पाठीत घातला
क्रोध रक्तांतूनी वाहे.

शत्रू सावधान आता
रक्त उसळे द्वेषाने 
छाटू मुंडकी तुमची
श्वास रोखून त्वेषाने.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News