वसुंधरा 

रोहिणी गायकवाड, नाशिक
Tuesday, 23 April 2019

एक एक झाड लावू या 
जंगलतोड थांबवू या 
पशुपक्षांना मिळे निवारा 
पर्जन्यमान वाढवू या

एकजुटीने वसुंधरेला वाचवू या
पर्यावरण रक्षण्या जागर आपण घालू या

एक एक झाड लावू या 
जंगलतोड थांबवू या 
पशुपक्षांना मिळे निवारा 
पर्जन्यमान वाढवू या

कमीत कमी हॉर्न वाजवू या 
जपूनी वाहने वापरु या 
नष्ट होईल खनिजसंपत्ती 
भविष्याचे भान राखू या

पाणी हेच आपुले जीवन 
काटकसरीने वापरु हे धन 
पाणी अडवा पाणी जिरवा 
थेंब थेंब पाणी साचवू या

प्लॅस्टिक वापरावर मर्यादा आणु 
गटारी नाले कचरा काढू 
शौचालयाचा वापर करुनी 
गाव स्वच्छ सुंदर करु या

जमिन पाणी हवा असे 
नैसर्गिक स्रोत खासे 
करूनी संवर्धन तयाचे 
सौर ऊर्जेचा वापर करू या

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News