वरुणचा ‘मिस्टर लेले’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020

अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो सध्या व्यस्त आहे. याशिवाय तो लवकरच दिग्दर्शक शशांक खैतान यांच्या ‘मिस्टर लेले’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो मराठमोळ्या भूमिकेत दिसणार असून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील झळकणार आहे. निर्मिती करण जौहरची आहे. २०२१च्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News