उत्तग आरोग्यासाठी महत्वाची वरूणमुद्रा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ )
Monday, 25 November 2019

रक्तविकार आणि त्वचारोग दूर करण्यास सहाय्यकारक ठरते. ही मुद्रा केल्यास शरीरातील कोरडेपणा दूर होऊन त्वचा चमकदार आणि मुलायम होऊ शकते. तसंच चेहऱ्याचं सौंदर्य वाढण्यास मदत होते. अश्या ह्या मुद्रेच नाव आहे वरुण मुद्रा.

आजच्या धावपळीच्या युगात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतो. कामाच्या निमित्ताने माणसाचे स्वतःच्या फिटनेस कडे दुर्लक्ष होत असते आणि त्याच्या परिणाम त्यांच्या शारीरिक आजारपणातून बाहेर पडताना दिसतो. त्यातून सगळ्यांना आजकाल अनेकांना रक्ताशी संबंधित विकार आणि त्वचारोग सतावत असतात. त्यामुळे त्यावर उपचार काय करावेत असा प्रश्न अनेकांना पडतात. आज आपण अशा मुद्रेविषयी जाणून घेऊ जी रक्तविकार आणि त्वचारोग दूर करण्यास सहाय्यकारक ठरते. ही मुद्रा केल्यास शरीरातील कोरडेपणा दूर होऊन त्वचा चमकदार आणि मुलायम होऊ शकते. तसंच चेहऱ्याचं सौंदर्य वाढण्यास मदत होते. अश्या ह्या मुद्रेच नाव आहे वरुण मुद्रा.

ही मुद्रा करण्यासाठी तुम्हाला योग्य वाटेल अशा कोणत्याही आरामदायी आसनात बसा. बसल्यावर कंबर आणि मान सरळ ठेवा. दोन्ही हातांच्या करंगळ्या वाकवून त्यांचा वरचा भाग अंगठ्याच्या वरच्या भागाला लावून एकमेकांवर थोडा दाब द्या. या क्रियेत इतर तीनही बोटं एकमेकांना जोडलेली आणि सरळ राहतील. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. इथे तळहात वरच्या दिशेला राहील. तळहात घट्ट आणि मनगटाच्या वर खांद्यापर्यंतचा हात काहीसा सैलसर राहिल. किमान दहा ते पंधरा मिनिटं वेळ ही मुद्रा करा. नियमितपणे करत राहिल्यास फायदा होऊ शकेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News