वरुण धवन लवकरच अडकणार विवाह बंधनात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

लग्नासाठी बी-टाऊनमधील काही मंडळींनी त्यांच्या तारखा रिझर्व्ह ठेवल्या असून या लग्नाला सलमान खान, सिद्धार्थ मल्होत्रा,जॉन अब्राहम, करण जोहर, अनिल कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, आणि रणवीर सिंग यांसारखे अनेक सेलेब्रिटी हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. 

मुंबई : येत्या शुक्रवारी वरुण आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्ट्रिट डान्सर 3 डी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आणि याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये वरुण व्यस्त आहे. गेल्या  अनेक दिवसांपासून वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्या नात्याची चर्चा बॉलीवूडमध्ये होत असतानाच त्यांच्या लग्नाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नताशा दलाल आणि वरुण धवन येत्या मे महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.हे लग्न गोव्यातील बीच रिसोर्टला किंवा एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार असून हे बॉलीवूडमधील सर्वात ग्रँड लग्न असणार आहे. यामध्ये संगीत, मेहंदी आणि रिसेप्शनचा समावेश असून हा विवाह सोहळा संपूर्ण एक आठवडा चालणार आहे.परंतु या लग्नाची तारीख गुपीत ठेवण्यात आली आहे.

या लग्नासाठी बी-टाऊनमधील काही मंडळींनी त्यांच्या तारखा रिझर्व्ह ठेवल्या असून या लग्नाला सलमान खान, सिद्धार्थ मल्होत्रा,जॉन अब्राहम, करण जोहर, अनिल कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, आणि रणवीर सिंग यांसारखे अनेक सेलेब्रिटी हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News