साडी नेसण्याचे विविध प्रकार जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

साडी नेसायचे ८०हून अधिक प्रकार आहेत. स्कार्फ रॅप स्टाइल ही साडीची पद्धत नेहमीच्या साडी नेसण्यासारखी असते. 

साडी हा प्रत्येक महिलेचा आवडता प्रकार आहे. बाजारात कपड्यांचे विविध प्रकार आले असले, तरी पारंपरिक साडीची जागा कोणीही घेऊ शकलेले नाही. महिलावर्गाचे साडीवर विशेष प्रेम असते. तुम्ही साडी कशी नेसता, यावर ती किती छान दिसते हे ठरते. आपण आज साडी नेसायचे विविध प्रकार पाहणार आहोत. 

साडी नेसायचे ८०हून अधिक प्रकार आहेत. स्कार्फ रॅप स्टाइल ही साडीची पद्धत नेहमीच्या साडी नेसण्यासारखी असते. फक्त पदराचा भाग स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळायचा असतो. नेक बेल्ट व इतर ॲक्‍सेसरीज वापरल्यास याला ग्लॅमरस लूक मिळतो. 

केप स्टाइल साडी नेसण्यासाठी तुमच्या साडीला मॅच होईल असा केप विकत घ्या. तुम्ही अशाप्रकारचा केप कापड घेऊन शिवूनही घेऊ शकता.    

हा केप ब्लाऊजवर गळ्याभोवती घाला व त्याच्या आतून किंवा बाहेरून पदर घ्या. पारदर्शक केप असल्यास तुमचे ब्लाऊजही त्यात उठून दिसेल.

नववधूच्या साडीवर आधारित असलेला साडी नेसण्याचा प्रकार म्हणजे बेल्ट स्टाइल प्रकार. साडी नेसा आणि कमरेवर बेल्ट घाला. बेल्ट स्टाइलमध्ये पारंपरिक लूक हवा असल्यास त्यावर कमर पट्टा किंवा कमरबंध वापरू शकता. 

धोती स्टाइल साडी हा आणखी एक साडी नेसायचा प्रकार तरुणींना भुरळ पाडत आहे. धोती स्टाइल साडी ही पॅंट स्टाइल साडी सारखीच असते. ही साडी परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण आहे. धोती स्टाइल नेसायची असल्यास शक्‍यतो प्लेन साडीचा वापर करा. प्रिंटेड साड्यांमुळे धोती स्टाइल स्पष्ट कळून येत नाही.

जलपरी साडी ही इतर साड्यांसारखीच नेसायची असते. परंतु पदर काढण्याच्या पद्धतीमुळे याचा पूर्ण शेपच बदलतो. भरजरी पदर असणाऱ्या साड्यांसाठी ही पद्धत उत्तम असते. साडीचा पदर घेताना या साडीचा आकार जलपरी सारखा दिसतो.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News